मुरगूडमध्ये लकी सेवा केंद्र यांचेवतीने रविवारी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता.कागल येथे लकी शेती सेवा केंद्र व एम . जे . अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ( दि.२२ ) ऑक्टोबर रोजी मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मेहता आय केअर अँन्ड लेजर सेंटर यांचेमार्फत मोफत डोळे तपासणी व अल्प खर्चामध्ये मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी मुरगुड व परिसरातील रुग्णांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन लकी सेवा केंद्राचे मालक हाजी बाळासाहेब मकानदार यांनी केले आहे.
मुरगूड येथील मुख्य बाजारपेठेत असलेले ‘लकी शेती सेवा केंद्र’ येथे रविवार दि .२२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत नेत्रतज्ञा मार्फत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
तसेच या शिबीरात महात्मा जोतिबा फुले, जनआरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत बसणाऱ्या सर्व नेत्र शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत . मोतीबिंदू निवड झालेल्या रुग्णानां त्याच दिवशी मेहता आय केअर सांगली येथे नेण्यात येणार असून ऑपरेशनसाठी येणाऱ्या पेशंटनां येण्या- जाण्याची , राहण्याची , जेवणाची सुविधा मोफत दिली जाणार आहे . या ऑपरेशननंतर लागणारे काळे गॉगलही मोफत देण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी हाजी बाळासाहेब मकानदार फोन नं .९४२३२७८०८६ व सर्जेराव भांडवले फोन नं .७७९८८६२१३५ यांच्याशी संपर्क साधावा .