महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला नेसरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
उत्तरप्रदेश लंखिमपूर खेड येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज नेसरी येथील व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या वेळी महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या यूपी सरकारच्या राज्यात जगाच्या पोशिंदा शेतकऱयांना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडने हि भीषण अतिरेक्यांना सुद्धा हे कृत्य शोभत नाही अशा शब्दात भावना व्यक्त करून यूपी सरकारचा निषेध करण्यात आला लांखीमपूर घटनेच्या दोषींना शासन झालेच पाहिजेत अशा भावना व्यक्त झाल्या.
यावेळी अमर हिडदुगी उपसरपंच ,रामा परीट सदस्य ग्राम पंचायत नेसरी,कार्तिक कोलेकर युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष,विलासभाई हल्याळी उपतालुका प्रमुख यांनी मनोगते व्यक्त केली ,मुन्नासो नाईकवाडी तंटा मुक्त अध्यक्ष ,जोतिबा भिकले माजी उपसभापती,भिकाजी दळवी काशीबाई दळवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ,उपस्थित होते आभार सागर नांदवडेकर यांनी मानले.