मुरगूडच्या शर्मिला वंडकर यांना आदर्श कला गौरव पुरस्कार प्रदान

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आदर्श फाउंडेशन सामाजिक सेवाभावी संस्था सांगली यांच्यावतीने देण्यात येणारा आदर्श कला गौरव पुरस्कार मुरगूड येथील शर्मिला विनायक वंडकर यांना प्रदान करण्यात आला. सिने अभिनेत्री व कोरिओग्राफर मि. शर्मिला वंडकर यांनी सामाजिक ,कला व कोरिओग्राफरमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन ,दसरा चौक, कोल्हापूर येथे हा पुरस्कार निवृत्त शिक्षण सहसंचालक मा. एम. के .गोंधळी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
गेली अकरा वर्षे ही संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करते. या संस्थेचे अध्यक्ष विजय लोहार व मार्गदर्शक डॉ. दगडू माने आणि सर्व सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधानगरी भुदरगडचे माजी आमदार बजरंग अण्णा देसाई होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन निवृत्त शिक्षण सहसंचालक एम.के गोंधळी होते.प्रमुख उपस्थितीमध्ये मराठा युवा संघर्ष समिती प्रदेशाध्यक्ष श्रीमती नेत्रदीप पाटील,सुदामराव गायकवाड, रवींद्र रायकर (पुणे), शिवाजी सुतार (गोवा),बाळासाहेब लोहार (सातारा), व सिने अभिनेते निवास कळसेकर उपस्थित होते.
शर्मिला वंडकर यांनी गेली सहा सात वर्ष सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून गोरगरिबांना मदत केली ,महिलांच्या हक्क व मागणीसाठी पुढाकार घेतला, भुकेलेल्यांना अन्नदान करून मानवता राखली, अडचणीत वंचितांना सतत मदतीचा हात पुढे करत कलाक्षेत्रात महिलांना धाडस देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे काम केले, स्वतः चित्रपटात काम करून इतर महिलांना धाडस देण्यास त्यांनी परावर्त केले ,अशा अनेक सामाजिक कामात त्या सतत पुढे असल्याने त्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या शिरपेचात मानाचा तुराच म्हणता येईल ,या सन्मानामुळे अनेक स्तरातून त्यांच्यावर कौतुक व अभिनंदन याचा वर्षा होत आहे.