ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : भरधाव वाहनाची दोन कार आणि चार दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू

कोल्हापूरच्या महावीर कॉलेज चौकात भीषण अपघात झाला आहे. कसबा बावड्याकडून आलेल्या चारचाकीची दोन कार आणि चार दुचाकींना धडक दिली आहे. अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघतात चार जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर पोलिस अधिक तपास करत आहे. ही घटना रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

वरुण कोरडे असं मृत तरुणाचं नाव असून तो बॅडमिंटनपटू होता.धडक दिलेल्या गाडीवर भारत सरकार जीएसटी इंटेलिजन्स असं लिहिलं होतं. MH10 EA9495 हा त्या गाडीचा नंबर आहे. ऋषिकेश कोतेकर हा गाडी चालवत होता. गाडी चालवताना तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे.या चारचाकीने भरधाव येत तीन चारचाकी आणि चार दुचाकींना धडक दिली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks