ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुडमध्ये शॉर्टसर्किटने दीड एकर ऊसाला लागली आग, अंदाजे दोन लाखांचे नुकसान

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड (ता. कागल) येथील शेतकरी प्रशांत बाबासो मेटकर यांच्या दीड एकर उसाला शार्टसर्किटने आग लागली. या आगीत दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा गाव कामगार तलाठी विजय गुरव व कोतवाल सीताराम कांबळे यांनी केला .घटनास्थळी वीज महामंडळाचे कर्मचारी भिकाजी चौगले ,युवराज मांगोरे , आदिनाथ ढेरे उपस्थित होते.
काल, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.मुरगुड येथील शेतकरी प्रशांत बाबासो मेटकर यांच्या मालकीच्या तोडणीस आलेल्या उसाला शॉर्टसर्किटने आग लागली. दरम्यान ,हमीदवाडा साखर कारखाना ,बिद्री साखर कारखाना ,व मुरगुड नगरपालिकेच्या अग्निबंब यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. शेतकऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने पंधरा ते वीस एकर ऊस आगीपासून वाचल्याने मोठे नुकसान टळले.