ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड : सकल मराठा समाजाच्या वतीने निपाणी-देवगड राज्य मार्गावर उद्या रास्ता रोको

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शासन मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार नाही, याच्या निषेधार्थ व मराठा समाजासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवार, दि. १९ रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून मुरगूड नाका नंबर एक या ठिकाणी निपाणी- देवगड राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
सकल मराठा समाज मुरगूड आणि मुरगूड नागरिक यांच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात येणार आहे. या अगोदर मुरगूडमध्ये मूक मोर्चा, शहर बंद, उपोषण या प्रकारची विविध आंदोलने आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आली आहेत. हे निवेदन मुरगूडचे पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी स्वीकारले.