गृहिणींसाठी खुशखबर ! महिला दिनानिमित्त PM मोदींची मोठी भेट, घरगुती LPG सिलिंडर दरात कपात

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आणि ट्विट करताना म्हणाले की, आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी भेट दिली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. ट्विट करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल.