शासकीय रुग्णवाहिका दांडिया खेळण्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी वापरणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : संभाजी ब्रिगेडची मागणी

शासकीय वैद्यकीय विद्यालयातील विद्यार्थिनींना दि. 15 ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजता सायरन लावून गरबा दांडिया खेळण्यासाठी शासकीय रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला. अत्यावश्यक सेवेमधील रुग्णवाहिका प्रवासासाठी वापरता येत नाही तरी देखील सायरन वाजवत प्रवास केला.
त्याचबरोबर एका दुचाकी स्वराला व चार चाकी गाडीला धडक देखील दिली.रुग्णवाहिकेचा गैरवापर केल्यास संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी केला.
एकीकडे सीपीआर रुग्णालयामध्ये रुग्णांचा प्रचंड भार असताना अशा पद्धतीने रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी असणारी रुग्णवाहिका दांडिया खेळण्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी वापरणे कितपत योग्य आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल लवकरात लवकर करावा अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सीपीआर वैद्यकीय अधिष्ठाता यांना देण्यात आला.