सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात अंनिसची कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा उत्साहात

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांच्या मुरगुड शाखेच्या वतीने “विवेकी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर” उत्साहात संपन्न झाले.
प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार यांच्या हस्ते झाले. समाजवादी प्रबोधिनीचे दलितमित्र डी डी चौगले, महाराष्ट्र अंनिस कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. बी एम हिर्डेकर यांच्या उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. कुंभार म्हणाले, “धर्म आणि संस्कृती दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची सरमिसळ करून गतिशीलता, सत्य,विज्ञान, विवेक यांना विरोध करणारी मंडळी प्रतिगामी आणि धर्मांध असतात. अंधश्रद्धा निर्माण करून जाणीवपूर्वक पसरवणाऱ्या यंत्रणेचा कोणता इंटरेस्ट असतो. याच्या पाठीमागील रहस्य समजावून घेण्यासाठी कार्यकर्त्याचा सैद्धांतिक पाया पक्का असायला हवा. कार्यकर्त्यांच्या संकल्पना स्पष्ट असल्या पाहिजेत.” डॉ. बी.एम.हिर्डेकर म्हणाले, “कार्यकर्त्याने स्वतःची आयडेंटिटी ही संवेदनशील गरजूंना मदत करणारा अडचणीच्या काळात पाठबळ देणारा अशी निर्माण करावी. प्रतिगामी शक्ती समोर थिजलेल्या शरणागत मानसिकतेत असलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक वेळेला नव्या स्ट्रॅटजी शोधाव्या लागतील.माणसे बदलतात यावर आधारित विश्वास ठेवून कार्यरत राहावे.”
दुसऱ्या सत्रात “महाराष्ट्र अंनिस वैचारिक व्यापक दृष्टिकोन” यावर रेश्मा खाडे व हरी आवळे यांनी मार्गदर्शन केले. “पॉवर वॉक” हा उपक्रम स्मिता कांबळे आणि प्रतिज्ञा कांबळे यांनी सादर केला.समारोपाच्या सत्रात “आधुनिक अंधश्रद्धा” या विषयावर गटचर्चा घेण्यात आली. समीर कटके आणि अमृता जाधव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी राज्यकार्यकरिणी सदस्य हर्षल जाधव, रेश्मा खाडे ,राजेशकुमार पाटील ,हरी आवळे, तेजस्विनी परबकर,हिराताई साबळे,वालुबाई कांबळे, सुदाम साबळे,सुदाम साबळे ,मोहित पोवार, मुक्ता निशांत, प्रतिज्ञा कांबळे ,महेश ओलेकर ,ओमकार कांबळे ,सचिन बनसोडे, सिद्धेश डवरी उपस्थित होते.
शहीद विरपत्नी लक्ष्मीबाई महाविद्यालय तिटवे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, कोल्हापूर, करवीर, कागल, राधानगरी ,कणेरी ,कोथळी परिसरातील अंनिस कार्यकर्ते, मास कम्युनिकेशन विभागाचे विद्यार्थी,समाजकार्य विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत शंकर कांबळे, प्रास्ताविक भीमराव कांबळे आभार प्रदीप वर्णे यांनी मानले. प्रबोधन शिबिर यशस्वी करण्यासाठी मुरगुड शाखेचे अध्यक्ष शंकरदादा कांबळे ,भीमराव कांबळे, सचिन सुतार ,स्मिता सुधीर, कृष्णा कांबळे, प्रदीप वर्णे, समीर कटके,विक्रमसिंह पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.