शिंदेवाड़ी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखचे उद्धघाटन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिंदेवाड़ी ता कागल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखचे उद्धघाटन झाले. शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या विचार व कार्यावर प्रभावित होऊन नुतन शिवसैनिक शिवबंधनात अडकले.यावेळी नुतन शिवसैनिक श्रावण ढेरे यांची शिंदेवाडी शाखाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. तर उपशाखा प्रमुख विनायक शिंदे, युवराज खराड़े ,शिवाजी जाधव, विनायक शिंदे यांची नियुक्ति करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे ,उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील ,अवजड वाहतुक जिल्हा प्रमुख हर्षल पाटील, शिवसेना कागल तालुका प्रमुख अशोक पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होते.
यावेळी सुनिल शिंत्रे , संभाजी भोकरे ,मारुती पूरीबुवा, युवराज पोवार, दिग्विजय पाटील, जयसिंग टिकले, बाबूराव शेवाले श्रावण ढेरे ,युवराज खराड़े , शिवाजी जाधव यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
यावेळी भिकाजी हलड़कर ,अविनाश शिंदे ,उत्तम पाटील ,युवराज पवार या शाखेचे प्रनिते शिवसेना उपतालुका प्रमुख मारुती पूरीबुवा ,दिग्विजय पाटिल विजय पाटील ,बाबूराव शेवाले, नागेश आसबे, युवसेना चे अवधूत पाटील, जयसिंग टिकले , विकास पाटील ,आदिनाथ पाटील ,पूर्णानंद जाधव ,सदानंद देसाई ,विजय भोई ,सात्तापा पाटील, तुषार पाटील ,एकनाथ माळी यांचेसह शिंदेवाडी ग्रामस्थ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.