गोकुळ संघाच्या दूध दर कपात संदर्भात मनसे स्टाईलने उद्या दिनांक १४/१०/२०२३ रोजी तीव्र आंदोलन

गायीच्या दूध खरेदी दर-कपातीला विरोध करत कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी रस्ता रोको आंदोलन करत गोकुळ संघाचा निषेध व्यक्त केला आहे, यावेळी सर्व दूध उत्पादकांनी गोकुळ संघाच्या कार्यालयात गायी- म्हैशींसह मोर्चा काढण्याचा इशाऱ्याची गांभीर्याने दखल न घेतल्याने व दूध दरामध्ये दर कपात रद्द न झाल्याने आम्ही या मुद्द्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाठिंबा देत मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी व कागल विधानसभा मतदारसंघातील बिद्री चिलिंग सेंटर येथे उद्या शनिवार दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
यासंदर्भातील पत्र कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे मुख्याधिकारी गोडबोले यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते पण कोणताही संदेश किंवा कुठलाही पत्र व्यवहार किंवा त्या संदर्भात कोणतेही ठोस उत्तर त्यांच्याकडून न मिळाल्यामुळे दूध उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी मनसे उद्या तीव्र आंदोलन करणार आहे, अशी माहिती मनसे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, मनसे जनाधिकार सेना जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे, कागल तालुका अध्यक्ष विनायक आवळे, भुदरगड तालुका अध्यक्ष अशोकराव पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.