ताज्या बातम्यामहाराष्ट्र

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार ! आरोपीस अटक

कळे प्रतिनिधी : अनिल सुतार

धामणी खोऱ्यातील एका गावातील महिलेचे बाथरूम मधील अंघोळीचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद संबंधित महिलेने कळे पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी किरण उत्तम पाटील वय 30 रा. जठारवाडी ता. करवीर याच्यावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

संशयिताने फिर्यादीचे बाथरूम मधील अंघोळीचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन फोनवरून, व्हाट्सअप मेसेज करून त्या महिलेला वेळोवेळी भेटायला बोलावले. मार्च 2020 ते दि. 14 जुलै 2023 पर्यंत मरळी येथील नवरत्न हॉटेल व परखंदळे येथील पी.के लॉजिंग वर नेऊन जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केलेत. तसेच विरोध केल्यावर शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान याप्रकरणी संशयित किरण पाटील याला कळे पोलीस पोलिसांनी अटक करून गुरुवारी (ता- 20) रोजी कळे-खेरीवडे न्यायालयामध्ये हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.याप्रकरणी कळे पोलीस ठाण्याचे सपोनि रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ शेंडगे पुढील तपास करत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks