मुरगूड मध्ये साजरा होणार दिमाखदार दसरा महोत्सव

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड च्या ग्रामदेवतेच्या वास्तू शांतीचा उत्सव याच वर्षी अत्यंत उत्साहात संपन्न झाला.स्थापत्यशास्त्राचा अतिशय सुंदर नमुना म्हणून या मंदिराचा उल्लेख केला जातो.दूर दूर हून भाविक मंदिरास भेट देत असतात.पाच दिवस चाललेल्या या वास्तू उत्सवाचा लाभ लाखो भाविकांनी घेतला होता.
या उत्सवानंतर प्रथमच देवीचा नवरात्रीय दसरा उत्सव यंदा मोठ्या दिमाखाने साजरा होत आहे. जागोजागी भव्य कमानी उभ्या रहात आहेत.विविध मंडळे व स्वराज्य संस्थांसुध्दा आपला सहभाग नोंदवत आहेत.
येथील मध्यवर्ती जमादार चौक परिसरातदेखील मशिदी जवळच दसरा महोत्सवाचे शानदार नियोजन केलेले आहे.
सर्वधर्म समभावाचे हे एक चांगले उदाहरण म्हणून याकडे पाहिले जाते.आर जे ग्रुप या स्वयंसेवी मंडळा मार्फत याचे नियोजन केलेले असून यामध्ये हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन अशा सर्व धर्मीय भक्तांचा समावेश आहे.वैदिक ग्रंथातील श्रीसुक्ता मध्ये महालक्ष्मी महिमा वर्णन केलेला आहे.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ……
अशी सर्वांचे मंगल करणारी ही देवता असून तिचा उत्सव तितक्याच भक्तिभावाने व उत्साहाने झाला पाहिजे म्हणून या महोत्सवाचे संयोजन केल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
मूर्ती प्रतिष्ठाने पासून विसर्जन मिरवणुकी पर्यंत च्या कार्यक्रमाचे नियोजन या उत्सवात केलेले असून त्यामध्ये दररोजची देवीची आरती,रेकॉर्ड डान्स स्पर्धा,खास महिलांच्या साठी लावणी शो ,ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वरसाज,मराठमोळा कार्यक्रम गीत राधाई,युवकांसाठी तनुश्री पुणेकर डान्स शो ,असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.खासदार संजय मंडलिक यांच्या सह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा यात सहभाग आहे.