आजरा : मासेवाडी येथे विनापरवाना देशी-विदेशी दारूसाठा जप्त ; तिघांविरोधात गुन्हा नोंद

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
मासेवाडी ता. आजरा येथे विनापरवाना देशी विदेशी दारू विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी राजाराम दत्तात्रय पाटील यांच्यासह गडहिंग्लज येथील दोन विदेशी दारू विक्री दुकानांच्या व्यवस्थापकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी , मासेवाडी येथील राजाराम पाटील यांचेकडे देशी विदेशी दारू विक्री करण्याचा परवाना नसताना गडहिंग्लज येथील दारू विक्रेत्यांनी ३६ हजार २१० रुपयांची देशी- विदेशी दारू त्याला विक्री केली. पाटील यांनी आपल्याजवळ विक्रीच्या उद्देशाने सदर दारू साठा जवळ बाळगल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मासेवाडी येथे पाटील यांचे कडून सदर दारूसाठा हस्तगत केला. याप्रकरणी राजू कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
या कारवाईत पो.हे.कॉ.समीर कांबळे,युवराज पाटील, अमर आडूळकर,राजेंद्र वरंडेकर (चालक),स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर यांनी भाग घेतला.