बिद्री कारखान्यास इथेनॉल प्रकल्पास शासनाचे इरादा पत्र मंजूर

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना ,मौनिनगर या कारखान्यास इथेनॉल तथा मद्यार्क निर्मितीस शासनाच्या विहित अटीवर इरादा पत्र प्राप्त झाले आहे अशी माहिती व्यवस्थापनाकडून मिळाली आहे.
हा प्रकल्प ९० %पूर्ण झाला असून शासनाच्या इरादा पत्राची मंजुरी मिळणे बाकी होते.
राज्य उत्पादन शुल्क ,मुंबई यांचे कडून प्रकल्पास१२ सप्टेंबर २०२३ च्या तारखेचे पत्र मिळाले आहे.
या प्रकल्पात प्रतिदिन ६० हजार ब.ली.इतके अति शुध्द जलविरहित मद्यार्क (इथेनॉल) तयार होऊ शकेल.इथेनॉल उपयोग पेट्रोल मध्ये मिसळण्या साठी सुध्दा होतो.म्हणून इथेनॉल निर्मितीस केंद्र सरकारकडून सुध्दा प्रोत्साहन दिले गेलेले आहे.
देशाची वाहन इंधनाची गरज लक्षात घेता बिद्रीच्या या प्रकल्पास अधिक महत्व प्राप्त होणार आहे. प्रकल्पाची उभारणी होऊनही स्थानिक राजकारणातील विरोधामुळे इरादा पत्र मिळण्यास आठ महिन्यांचा विलंब लागला असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
साधारणपणे नोहेंबर २०२३ मध्ये उत्पादन सुरू होऊ शकेल असे व्यवस्थापक यांनी सांगितले.