ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुड ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश व श्वान दंश लसीचा साठा मोठ्या प्रमाणात करा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड येथील ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश व श्वान दंश यावरील लसीचा साठा मोठ्या प्रमाणात करून ठेवावा.तसेच श्वान दंशावरील रुग्णांना सीपीआर ला न पाठवता मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करावेत . अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कागल तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे ग्रामीण रुग्णालयास दिला आहे.

ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश व श्वान दंश झालेले रुग्ण परिसरातील गावा गावातून उपचारा साठी मोठ्या प्रमाणात रुण येत असतात . कालच शिंदेवाडी यमगे व मुरगूड येथील १२ लोकांना पिसाळलेल्या श्वानाचा दंश झाला आहे. यातील काही रुग्ण ग्रामीण रुग्णालयात आले होते . त्यांच्यावर प्रथमोपचार करीत त्यांना पुढील उपचारांसाठी कोल्हापुर CPR ला पाठवण्यात आले . तसे न करता मुरगुड ग्रामीण रुग्णालयात श्वान दंशावरील लसीची उपलब्धता करण्यात यावी . तसेच सर्पदंशावरील लसही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करावी . अशी मागणी शिवसेना ( ठाकरे ) कागल तालुक्याच्या वतीने करण्यात आली असून तसे न केल्यास शिवसेनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे .

निवेदनावर शिवसेना तालुका उपप्रमुख मारुती पूरीबुवा शिवसेना विभाग प्रमुख विजय पाटील , शिवसेना विभाग प्रमुख दिग्विजय पाटील , मुरगुड शहर प्रमुख आदिनाथ पाटील , शाखा प्रमुख पूर्णानंद जाधव ,अभिजीत जाधव ,विनायक शिंदे , श्रावन ढेरे ,शिवाजी जाधव ,सर्पमित्र सुरेश शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks