चंदगड : तुडये गावच्या विक्रम पाटील यांची मुंबई पोलिस अंमलदार पदी निवड

चंदगड प्रतिनिधी/ पुंडलिक सुतार
तुडये ता.चंदगड येतील सुपुत्र विक्रम मधुकर पाटील यांची महाराष्ट्र पोलिस (मुंबई शहर) साठी पोलिस अंमलदर पदी निवड झालेने पंचक्रोशीत आनंदाचे वातावरान झाले आहे.विक्रम मधुकर पाटील हे कोल्हापूर येथे वागरे – पाटील फौंडेशन कोल्हापूर येथे सराव करत होते.
आई वडील शेतकरी आसल्याने गावी आल्यावर शेतातील कामे करणे, दुग्धव्यवसाय इत्यादी कामात मदत करून मिळेल त्या वेळेत आपला नेहमीचा अभ्यास व शारिरिक चाचनीचा सराव करत होता.
2013 – 2023 पर्यंत चा प्रवास मध्ये Army, CRPF, BSF, Maharashtra Police या सर्व प्रकारच्या भरती देत होता व ऐक ,दोन मार्कने फायनल मिरीट मध्ये बाहेर पडत होता. पण जिद्दीच्या जोरावर विक्रम मधुकर पाटील याची मुंबई पोलिस पदी निवड झाली यासाठी त्याला वडील मधुकर दाजीबा पाटील ,आई स्वाती पाटील ,बहीण कोमल पाटील तसेच मार्गदर्शक ज्ञानेश्वर वागरे – पाटील (कोल्हापूर) यांचे खंबीर साथ सहकार्य आणि मार्गदर्शक लाभले.