कोल्हापूर : मिरवणुकीतील ट्रॅक्टर-ट्रॉली मागे घेण्यावरून दोन्ही मंडळांच्या कार्यकत्यांमध्ये दगडफेक ; वादाचे रूपांतर हाणामारीत ; चार जण जखमी

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली होती. खरी कॉर्नरजवळ लक्षतीर्थ वसाहत मधील pm बॉईस मंडळ आणि शिवाजी पेठेतील झुंझार क्लब मंडळ यांच्यात मिरवणुकीतील ट्रॅक्टर-ट्रॉली मागे घेण्यावरून दोन्ही मंडळांच्या कार्यकत्यांमध्ये वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अचानक एकमेकांवर दगडफेक सुरू केल्याने वातावरण तापले.
या परिसरात देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अचानक दगडफेक सुरु झाल्याने गणपती पहायला आलेले नागरिकांची पळापळ सुरू झाली. या दगडफेकीत सुरुवातीला दोन युवक जखमी झाले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत मंडळांच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. मात्र, थोड्यावेळाने पुन्हा या दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होऊन हाणामारी झाली.देखावे पाहण्यासाठी आलेले आणखी दोन युवक जखमी झाले.