ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना घरकुल मंजुरीपत्रांचे वाटप ; ठाणेवाडीच्या पाच जणांना घरकुले मंजूर

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना घरकुलांच्या मंजुरीपत्रांचे वाटप झाले. यावेळी कामगार कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विकास घोडके, अशोक वड्ड उपस्थित होते.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने ही घरकुले मंजूर झाली आहेत. अटल बांधकाम कामगार आवास (ग्रामीण) योजनेअंतर्गत ठाणेवाडी ता. कागल येथील पाचजणांना या घरकुल मंजुरीपत्रांचे वाटप झाले. या योजनेंतर्गत प्रत्येक घरकुलाच्या बांधकामासाठी दोन लाख रुपये मिळणार आहेत.
घरकुले मंजूर झालेल्या बांधकाम कामगारांची नावे अशी, संभाजी गणपती तोरसे, सुशीला बंडू तोरसे, शोभा आनंदा गोरे, श्रीमती हौसाबाई तोरसे, सुप्रिया राजाराम तोरसे.