कागलमध्ये आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण ; केडीसीसी बँक अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जपुरवठ्यात जिल्ह्यात अग्रस्थानी

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
केडीसीसी बँकेकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अर्थसाहाय्यातून रोजगार निर्मितीसाठी द्यावयाच्या कर्जांच्या मंजुरी पत्रांचे वाटप बँकेचे अध्यक्ष व आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण झाले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँक सर्वच प्रकारच्या उद्योग व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर आहे. मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसायाभिमुख करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अण्णासाहेब पाटील योजनेमधून प्रकरणे सुरू आहेत. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार ज्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांना आर्थिक स्थैर्य देवून व्यवसायाभिमुख करण्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे योगदान मोठे आहे. मराठा समाजासह इतर मागासवर्ग समाजासाठीही उद्योग, व्यवसाय व रोजगारवाढीच्या दृष्टीने तरुणांनी केडीसीसी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी हिंदुराव बुजवडे, रणजीत बन्ने, शिवाजीराव माने आदी प्रमुख उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज मंजूर झालेल्यांची नावे अशी…..
संग्राम राजाराम पाटील – म्हाकवे, पांडूरंग शामराव मेंगाणे – मळगे खुर्द, ऋतुराज प्रशांत वास्कर – कागल, सुखदेव महादेव पाटील – सावर्डे बुद्रुक, बाळासो आनंदा बोंगार्डे – बानगे, बाळासो बजाप्पा बुजवडे – गोरंबे, प्रथमेश दत्तात्रय पाटील- म्हाकवे, अनिकेत बाजीराव लोंढे – सोनाळी.