ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑनलाइन अ‍ॅपवर झालेली ओळख महागात ; महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करुन अनैसर्गिक कृत्य

ऑनलाइन अ‍ॅपवरुन झालेली ओळख महाविद्यालयीन तरुणाला महागात पडली. तरुणाला आमिष दाखवून त्याचे ससून रुग्णालय परिसरातून अपहरण करण्यात आले. भोसरी परिसरात तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याशी तिघांनी अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर आरोपींनी तरुणाला धमकावून त्याच्याकडील २८ हजार ५०० रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली.

याबाबत एका २१ वर्षाच्या तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३०७/२३) दिली आहे. हा प्रकार १ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण तळेगाव दाभाडे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. एका अ‍ॅपवरुन तरुणाची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्याला पुणे स्टेशन परिसरात भेटण्यास बोलावले. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तरुणाला मोटारीत बसण्यास सांगितले. फिरायला जाऊ असे सांगून आरोपींनी त्याला मोटारीतून भोसरी एमआयडीसी परिसरात नेले.

भोसरी एमआयडीसी परिसरात निर्जन जागी आरोपींनी त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले.
तरुणाला धमकावून ऑनलाइन पद्धतीने त्याच्या खात्यातील २८ हजार ५०० रुपये काढून घेतले.
त्यानंतर तरुणाला सोडून तिघे जण मोटारीतून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks