ताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक : नांदेडनंतर आता छ. संभाजीनगरच्या ‘घाटी’ रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू

नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. यात आणखी 4 नवजातांसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील 48 तासात मृतांची संख्या 31 वर पोहचली आहे. ही घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात गेल्या दोन दिवसांमध्ये 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 2 नवजात बालकांचा समावेश आहे. नांदेडमध्ये औषधांच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचे समजतेय. दरम्यान, नांदेडमधील घटनेनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सुदैवाने घाटी रुग्णालयात अजून आठ दिवस पुरेल एवढा औषधांचा साठा उपलब्ध आहे. परंतु काही औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घाटी रुग्णालयात खान्देश आणि मराठवाड्यातील रुग्ण मोठ्याप्रमाणात उपचारासाठी येतात. त्यामुळे इथे अत्यावस्थ रुग्णांच्या मृत्यूंची संख्या दररोज सरासरी 5 ते 7 एवढी आहे.

डॉक्टरांची प्रतिक्रिया…

घाटी रुग्णालयात मरणासन्न अवस्थे रुग्ण येतात. केवळ संभाजीनगर मधील नाहीत तर खान्देश,
मराठवाड्यातील रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असतात. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण जास्त असल्याचं घाटी हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे. मृत्यूचे समर्थन आम्ही करत नाही मात्र अत्यंत क्रिटिकल अवस्थेत रुग्ण येत असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दिवसाला 8 -10 मृत्यू होतात तर महिन्याला
300 -350 मृत्यू होतात. परंतु रुग्णाचा जीव वाचवणं हे आमचं कर्तव्य असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks