गौॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनीमार्फत सायलेज विक्रीस प्रारंभ व संगणकीकरणाचे उद्घघाटन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गौॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनी शिंदेवाडीचे वतीने सायलेज विक्रीस प्रारंभ व संगणकीकरणाचे उद्घघाटन आज पार पडले. वैरण कंपनीचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी संगणकीकरण फायदेशीर ठरणार आहे. संगणकाचे उद्घघाटन मसोबा सेवा संस्थेच्या संचालिका सौ.आक्काताई खराडे यांचे हस्ते झाले.
दैनंदिन कामकाजा बरोबरच पशुपालकांना सायलेज सुकाचारा कंपनीकडे ऑनलाइन मागणी करता येणार आहे तसेच मक्का उत्पादकांचा तोडणी कार्यक्रम ऑनलाईन मिळणार आहे. शास्त्रीय पद्धतीने बनवलेले सायलेज कंपनीचे वतीने आजपासून विक्रीस सुरुवात केली असुन सायलेजमुळे जनावरांचे दुधातवाढ होणे बरोबर पशुखाद्यावरील खर्च कमी करण्यास मदत होणार आहे .हे सायलेज पशुपालकांच्या मागणीनुसार घरपोच देणेचा प्रयत्न कंपनीच्या वतीने सुरू आहे. अशी माहिती योगेश खराडे यांनी दिली.
नजीकच्या काळात शेतकऱ्यांचा मक्का चांगल्या दराने खरेदी करून उत्कृष्ट क्वालिटीचे सायलेज बनवून योग्य दराने पशुपालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कंपनीमार्फत केले जाणार आहे .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुंडलिक केरू खराडे उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजित मोरबाळे,सागर किल्लेदार, तानाजी खराडे ,एकनाथ पोवार ,सर्जेराव पाटील, तुकाराम शिंदे ,संजय शिंदे, संतोष खराडे ,विष्णू मोरबाळे, वरूण खराडे ,सुहास खराडे उपस्थित होते.