ताज्या बातम्यामहाराष्ट्र
संतापजनक ! १० वर्षाच्या मुलीशी ४२ वर्षीय पोलिसाचे अश्लील चाळे ; विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

अतिशय संतापजनक असा प्रकार नारायणगाव जवळ घडला आहे. येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने १० वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे हा पोलीस कर्मचारी सध्या पोलीस नाईक म्हणून जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याच्याविरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सदर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव नारायण भाऊसाहेब बडे (वय ४२), असे आहे.त्याने काल महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा गुन्हा केला. हे कृत्य केल्यानंतर बर्डे एका खाजगी रूग्णालयात दाखल झाला होता.त्याच्याविरूद्ध वियभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला रात्री उशीरा अटक केली.