कागलमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज मंजुरीपत्रांचे वाटप

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागलमध्ये केडीसीसी बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते.
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँकेच्यावतीने मराठा समाजातील तरुण-तरुणींना उद्योग व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी मोठ्या प्रमाणात केडीसीसी बँकेच्यावतीने अर्थसहाय्य दिले जात आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मंजूरीपत्रे दिलेल्यांची नावे अशी, शिवराज भरमकर- कागल, रेखा फराकटे -बोरवडे, संभाजी हिरुगडे -सावर्डे बुद्रुक, रावसाहेब माने -पिराचीवाडी, संजय पाटील -मळगे खुर्द, नेताजी भोसले -गोरंबे, गीता मुडुकशिवाले- मळगे बुद्रुक, निवास लुगडे- अर्जुनवाडा, अमर मालवेकर- सावर्डे खुर्द, संतोष जंगटे- वंदूर, वैभव शिंदे- बेलवळे बुद्रुक.