शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम संपन्न

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजण्यासाठी शासनाच्यावतीने स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत शिंदेवाडी (ता. कागल) येथील ग्रामपंचायत शिंदेवाडी तसेच श्रीराम विद्या मंदिर शिंदेवाडी याचेवतीने ‘स्वच्छता हीच सेवा, कचरा मुक्त भारत’ या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता करून ‘एक तारीख एक तास’ हे अभियान यशस्वी केले.
याप्रसंगी बोलताना बिद्री कारखान्याचे माजी.व्हा.चेअरमन दत्तामामा खराडे म्हणाले, स्वच्छता ही आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. यावेळी शिंदेवाडी गावच्या सरपंच रेखा माळी ,ग्रा.पं.सदस्य अजित मोरबाळे ,राहुल खराडे ,निवृत्त मुख्याध्यापक अरविंद शिंदे ,ग्रामसेवक विजय पाटील शिक्षिका रोहिणी लोकरे,दीपाली कांबळे मॅडम यांच्यासह आशसेविका,अंगणवाडी सेविका, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.