ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये शिवराज विद्यालयाची अर्चना पाटील ठरली वेगवान खेळाडू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धेमध्ये येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगुडची विद्यार्थिनी कु. अर्चना विनोद पाटील ही १४ वर्षाखालील वयोगटात कागल तालुक्यात सर्वात वेगवान मुलगी ठरली. ती २०० मी. धावणे मध्ये उपविजेती ठरली.

याशिवाय या शाळेची विभा भरत पाटीलने १०० मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ४X१०० मीटर रिले शर्यतीमध्ये शिवराजचा संघ उपविजेती ठरला. संघामध्ये अर्चना पाटील, स्वरा पाटील, विभा पाटील, जान्हवी भारमल यांचा समावेश आहे.

क्रीडाशिक्षक एकनाथ आरडे यांचे मार्गदर्शन, प्राचार्य पी. डी. माने, उपमुख्याध्यापक प्रा. रवींद्र शिंदे पर्यवेक्षक संतोष कुडाळकर यांचे प्रोत्साहन लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks