मुरगूडमध्ये १ऑक्टोबर ला ‘ एक तारीख – एक घंटा’ हा स्वच्छता उपक्रम

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता.कागल येथील मुरगुड नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मुरगूड मधील सर्व नागरिकांच्या सहभागातून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता ही सेवा २०२३ अंतर्गत दि. ०१ ऑक्टोबर, २०२३ रोजी एक तारीख – एक घंटा ( एक तारीख एक तास) हा स्वच्छता – उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत असल्याची माहिती मुरगूड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. संदिप घार्गे यांनी दिली असून या स्वच्छता मोहिमेमध्ये मुरगूड मधील सर्व नागरिकांनी त्यांच्या जवळच्या निश्चित केलेल्या उपक्रम कार्यस्थळी उपस्थित राहून स्वतःचा सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन ही त्यांनी केले.
सदरचा स्वच्छता उपक्रमाची शहरातील निश्चिल केलेली ठिकाणे पुढील प्रमाणे : कुरणी बंधारा नदी घाट, जलशुध्दीकरण केंद्र, सुलोचनादेवी पाटील गाव तलाव, मुरगूड बस स्थानक, श्री दत्त मंदिर नदी घाट सांडपाणी प्रकल्प व स्मशानभूमी , सरपिराजीराव तलाव, शिवाजी पार्क कापशी रोड या ठिकाणी उपक्रमात मुरगूड शहरातील सर्व नागरिकांनी सकाळी ९.४५ वाजता उपस्थित राहावे. व या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा. तसेच नागरिकांनी उपक्रम ठिकाणी उपस्थित राहताना सोबत पाण्याची बॉटल घेऊन यावे.