मुरगुडमध्ये सोमवारी ‘समरजितसिंह आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता.कागल येथे सोमवारी (ता.२) ऑक्टोबर रोजी ‘समरजितसिंह आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त ‘चला संकल्प करूया ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ देऊया’ या नागरिकांसाठीच्या विशेष अभियानांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते या कार्यक्रमचे उद्घाटन होईल. यावेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे , गोकुळचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
मुरगुड, शिंदेवाडी, कुरणी, यमगे, चिमगाव,अवचितवाडी, दौलतवाडी, सुरूपली, कुरुकली, निढोरी, भडगाव, उंदरवाडी या बारा गावातील नागरिकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्यावतीने मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज येथे सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत हा उपक्रम होणार आहे.याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
याआधी कागल शहर,उत्तूर व कसबा सांगाव येथे राबविलेल्या या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अभियानांतर्गत विविध प्रकारचे दाखले व शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.