कागल विधानसभा मतदारसंघातील 20 कोटींच्या ‘जलजीवन’च्या पुरवणी आराखड्यास मंजुरी : राजे समरजितसिंह घाटगे ;14 योजनांची कामे लागणार मार्गी

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पुरवणी आराखड्यास नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे.यामध्ये प्रामुख्याने कागल विधानसभा मतदारसंघातील एकुण 14 योजनांचा समावेश असून 20 कोटींच्या पुरवणी आराखड्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली. या कामी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नाम.गुलाबराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे राजे समरजीतसिंह घाटगे यांनी म्हटले आहे.
कागल तालुक्यातील पुढील गावांसाठी मंजूर झालेल्या निधीचा तपशील असा , मळगे खुर्द 1 कोटी 30 लाख,खडकेवाडा 1 कोटी 67 लाख,निढोरी 1 कोटी 54 लाख,बामणी 2 कोटी 2 लाख, कुरणी 60 लाख, बोळावी 83 लाख,भडगाव 1 कोटी 83 लाख, बाचणी 4 कोटी 70 लाख, चिमगाव 1 कोटी 9 लाख,बेलवळे बु.1 कोटी 90 लाख,यमगे 60 लाख,सावर्डे बु. 86 लाख. भादवण (ता. आजरा) 1 कोटी 54 लाख.
ग्रामीण भागातील नागरिकांना नळाद्वारे स्वच्छ व मूबलक पाणीपुरवठा करण्यासाठी “जलजीवन मिशन” हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतलेला आहे.यामध्ये प्रत्येक मनुष्यास 55 लिटरप्रमाणे गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सविस्तर आराखडे तयार करण्याच्या सूचना केंद्राने दिलेल्या आहेत.
जलजीवन योजनेमध्ये कागल विधानसभा मतदारसंघाला निधी मिळाल्यामुळे तालुक्यातील कांही गावांमध्ये नवीन योजना तर कांही गावातील पाणी योजनांची क्षमताही वाढणार आहे तर कांही योजनांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे.त्यामुळे येत्या काळात कागल विधानसभा मतदारसंघात ऐन उन्हाळ्यात नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई निकालात निघणार असल्याचे श्री. घाटगे यांनी म्हटले आहे.