ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : सातवणेत देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
सातवणे ता चंदगड येथील घरगुती व सार्वजनिक गणेशउत्सव दरम्यान येथील विविध देखावे पाहण्यासाठी भविकांची गर्दी गेल्या चार दिवसांपासून पहायला मिळते आहे.यामध्ये जोतिबा जाधव यांनी कोळी लोकांचा देखावा व दशरथ गाडे यांचा श्रावण बाळ देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेतो आहे तर गावातील इतर आकर्षक देखावे पाहण्यासाठी भाविकांची तोबा गर्दी होते आहे.