राधानगरी तालुक्यात हिमोग्लोबीन तपासणी व एनिमिया जनजागृती शिबीर उत्साहात

राधानगरी प्रतिनिधी :
नेहरू युवा केंद्र कोल्हापूर युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिमोग्लोबिन तपासणी व एनिमिया जनजागृती अभियान ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील ग्रामीण रुग्णालय सोळांकूर , ग्रामीण रुग्णालय राधानगरी, प्राथमिक आरोग्य केंद्र सरवडे, गणेश प्रेमी तरुण मंडळ सावर्डे पाटणकर व बाळूमामा पॅरामेडिकल कॉलेज अशा ठिकाणी राबविण्यात आले.
तसेच नेहरू युवा केंद्र संघटन चे राधानगरी तालुका राष्ट्रीय युवा स्वयंसेवक गौरव पाटील यांनी शासकीय योजना व आपल्याला आरोग्य उपचार घेण्यासाठी कसे उपचार घेण्यात येतील याचे व तसेच एनिमिया मुक्त भारत होण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करून हिमोग्लोबीन तपासणी व एनिमिया तपासणी करण्यास त्यांनी युवक युवतींना मार्गदर्शन करून भारत एनिमिया मुक्त करुया असे ते बोलत होते.
एनीमिया मुक्त करण्यासाठी आहार कोणता घ्यावा आरोग्याची काळजी कशी घ्यायची व एनिमिया झाला असेल तर त्याची लक्षणे काय आहेत तसेच घाबरून न जाता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार घेऊन भारत मुक्त करूया असे त्यांनी सांगितले.
यासाठी सर्व वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी तसेच प्राचार्य, मंडळाचे कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले.