मुरगुड विद्यालयाला जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेतेपद

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटात मुरगूड विद्यालय (ज्युनि कॉलेज) च्या संघाने उपविजेतेपद पटकावले.या संघातील वरद घाटगे,आयुष मोरबाळे यांची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय निवडचाचणी साठी निवड झाली आहे.
या संघाने आजरा व करवीर संघावर सहज मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.हातकणगले तालुक्यातील आदर्श विद्यानिकेतन मिणचे व मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड यांच्यात अटीतटीचा सामना झाला या सामन्यात मुरगुड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागला.या संघात वरद घाटगे,आयुष मोरबाळे,रणवीर घाटगे,लगमान्ना डोणे,शौर्य शेणवी,आचल कांबळे, ओंकार पाटील,श्रेयस पाटील,समर्थ रानगे,श्रेयस कोंडेकर,विश्वजित कांबळे,यश दबडे,स्वयंम बाबर,यांचा समावेश होता.
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे सचिव जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानी देसाई उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत,चेअरमन मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई कोजीमाशीचे चेअरमन बाळ डेळेकर ,प्राचार्य एस. आर. पाटील,उपमुख्याध्यापक एस .बी .सूर्यवंशी, उपप्राचार्य एस.पी. पाटील,पर्यवेक्षक एस.डी.साठे प्रशिक्षक अनिल पाटील,विषु रामाने, अजय बोटे, सुनील घाटगे,निलेश चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.