ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गणेश विसर्जन मिरवणूकीत आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या १० मंडळावर मुरगुड पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील गणेश विसर्जन मिरवणूकीत आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या ४ गावातील १० मंडळावर मुरगुड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये जय काली तरुण मंडळ, संघर्ष तरुण मंडळ, पंचमुखी तरुण मंडळ, नवोदय तरुण मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, तसेच आझाद तरुण मंडळ, झुंझार क्रांती तरुण मंडळ व गुरु हनुमान आखाडा मळगे खुर्द, समर्थ बॉईज चिखली आदि मंडळांवर कारवाई करण्यात आली.
तर सेनापती कापशी येथील गणेश तरुण मंडळाने गणेश आगमन मिरवणूकीत ध्वनी प्रदुर्षणाच्या नियमांचा भंग केला. म्हणून मंडळ चे पदाधिकारी, साऊंड सिस्टीम मालक, टॅक्टर चालक यांच्यावर कारवाई केली होती. त्यानुसार चौघांना प्रत्येकी २५०० रुपये असा १० हजारांचा दंड कागल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठवला.