गावच्या मातीतील सत्कार कधीही विसरणार नाही:आनंदराव मटकर

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
हंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मुंबई पोलीस दलातून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वर्ग-१ या पदावरून सेवानिवृत्त झालेने माझा सपत्नीक गावच्या मातीतील जो सत्कार झाला. तो मी कधीही विसरणार नाही. तसेच इथून पुढेही मी गावची सेवा करीत राहणार असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आनंदराव मटकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी शिवराज कॉलेज चे प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते.
स्वागत तालुका संघाचे मॅनेजर जनार्दन बामणे यांनी करून आनंदराव मटकर यांनी संघर्ष करून नोकरी कशी मिळवली व ते आपल्या जीवनप्रवासात यशस्वी झाले हे प्रास्ताविकातून सांगितले यानंतर उपस्थित मान्यवर व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. नंतर सत्कारमूर्ती आनंदराव मटकर व त्यांच्या पत्नी वंदना मटकर यांचा सत्कार भर आहेर देऊन माजी प्रा.एस.डी.कदम व प्रेमा कदम यांच्या हस्ते झाला.
यानंतर बोलताना सौ प्रेमा कदम म्हणाल्या की सेवानिवृत्ती नंतर चे जीवन आपल्या कुटुंबासाठी व गावासाठी व्यतीत करावे असे सांगितले यानंतर बोलताना माजी प्रा. एस.डी.कदम म्हणाले की आनंदराव मटकर यांचा आदर्श तरुण पिढीने घेऊन स्वतः चा व गावचा विकास साधावा असे सांगितले यानंतर बोलताना पी.एस. आय.कुमार ढेरे म्हणाले की गावच्या सत्कारानी तरुण पिढीला प्रेरणा मिळते हा उपक्रम चांगला आहे असे सांगून आनंदराव मटकर यांना शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना माजी प्राचार्य एम.डी.कदम म्हणाले की आनंदरावनी अत्यंत जिद्दीने बाहेरून फॉर्म भरून शिक्षण घेतले व पुढे स्पर्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले व आपल्या जीवनात ते यशस्वी झाले व पत्नीने ही त्यांना खंबीरपणे साथ दिली. या कुटुंबाला आमच्या शुभेच्छा असल्याचे सांगितले पुढे बोलताना श्री मटकर यांच्या पत्नी सौ.वंदना मटकर म्हणाल्या की गावाने सत्कार केला तो आम्ही विसरणार नाही. पुढेही आम्ही गावची सेवा करू असे सांगितले.
अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ.एस. एम.कदम म्हणाले की आनंदराव मटकर यांच्यातील अभ्यासाची जिद्द ,चिकाटी चे अनुकरण आजच्या तरुण पिढीने करावे तसेच आपल्या जीवनात आई, वडील,मित्र,व गुरू या चार व्यक्तींचेच ऐका तुम्ही यशस्वी व्हाल असे सांगून श्री मटकर याना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन एन.डी. रेडेकर यांनी केले आभार एस.डी. कदम यांनी मानले.
यावेळी सर्व ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते .कार्यक्रम पार पाडणेसाठी मधुकर हेबाळकर , उपसरपंच सदाशिव हेबाळकर, के .के. कदम , रमेश कदम, पो.पा. पुंडलिक फडके , मॅनेजर जनार्दन बामणे ,मोहन हेबाळकर , प्रकाश जाधव, सुरेश शिंदे, कृष्णा शिंदे, विष्णू रेडेकर व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.