कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे नविद मुश्रीफ साहेब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक मा.श्री.नविद मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नविद मुश्रीफ युवा अधिष्ठान यांच्यामार्फत कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR) येथे सर्व नवजात शिशु बालकांचा माता पिता यांच्या कडे लहान बाळास ड्रेस व हिमालया बेबी किटचे वाटप करण्यात आले.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश गुरव म्हणाले, नविद मुश्रीफ यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्तांनी सामाजिक उपक्रम म्हणून सी.पी.आर. मध्ये साजरा केला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. यांचा आदर्श इतरांनीही घेऊन गोरगरीबांना मदत करावी.
यावेळी स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ.भास्कर मूर्ती, कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदिल फरास, माजी स्थायी सभापती रमेश पोवार, कोल्हापुर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्षस्थानी महेन्द्र चव्हाण, कोल्हापूर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष प्रसाद ऊगवे, सौ.अंजली देवरकर (मेट्रन), डॉ.गिरीश कांबळे, डॉ.शिरीष शानबाग, बंटी सावंत, अमोल डोईफोडे, मोहसिन मुल्लाणी, मुकेश मठुरे, तुषार भास्कर, निहाल जमादार, निखील कोराणे, शांतिजीत कदम, विघ्नेश आरते, तुषार गुरव, तनवीर काझी, राहुल सोनटक्के, सुरज कांबळे व सोहेल मुल्लाणी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.