घरफाळा, पाणीपट्टी माफ करा; मुरगुड पुरग्रस्तानी केली नगरपालिकाकडे केली निवेदनाद्वारे मागणी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.येथील नुकसान ग्रस्त रहिवाशी यांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावीअशी मागणी निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे .
वेदगंगा नदी ला आलेल्या मुहापुराने धोक्याची पातळी ओलांडली.मुरगुड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर पिराजी राव तलावामधुन पाण्याचा मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरू झाला.चारही बाजुचे रस्ते पाण्यामुळे बंद झाले.शहराला बेटांचे स्वरूप प्राप्त झाले. मुरगुड शहरातील चौगले गल्ली, कुंभार गल्ली विठ्ठल मंदिर परिसर, नाका नंबर एक परिसर व इतर भागात नदीचे पाणी घरामध्ये घुसून अनेक रहिवाशी नागरिकांचे घरे पडली आहेत. काही नागरिकांच्या घराच्या भिंती पडलेल्या आहेत. अतिवृष्टी झाल्यामुळे घरामध्ये पाणी गेल्याने अपरिमित असे नुकसान झालेले आहे. अशा बांधीत कुटुंबांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये घरफाळा भरणे पाणीपट्टी भरणे अडचणीचे आहे.
तरी मुरगुड नगरपालिकेने यांचा विचार करून घरफाळा व पाणीपट्टी माफ करावे. अशा मागणीचे निवेदन नगरपालीकेत देण्यात आले. नगरपालितील शितल पाटील, अभियंता प्रकाश पोतदार यांनी सदरचे निवेदन स्विकारले..
या निवेदनावर माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील विरुद्ध पक्ष नेते राहुल वंडकर माजी नगराध्यक्ष नम्रता भांदीगरे, ॲड सुधीर सावर्डेकर, संपत कोळी,नामदेव भांदीगरे,संजय मोरबाळे, शिवाजी सातवळेकर, गणपती बारड ,राजू चव्हाण ,बी.एम.मेडके बाळासो मेंडके ,रणजित मुगदुम आदींच्या सह्या आहेत.