जीवनमंत्रताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली ‘रांगणा’ पदभ्रमंती; चांगले आरोग्य व मनःस्वास्थ्यासाठी ट्रेकिंग आवश्यक : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे

चांगल्या आरोग्याबरोबरच मनः स्वास्थ्यासाठी ट्रेकिंग आवश्यक असून सर्वांनी ट्रेकिंग करायला हवे, असे मत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केले.

पर्यटन दिन सप्ताहांतर्गत रांगणा पदभ्रमंती मध्ये आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार सहभागी झाले. डोंगर परिसरात असणारे ऊन, वारा, पाऊस, चिखल व पावसाची तमा न बाळगता पायवाटेत आडव्या येणाऱ्या ओढ्या नाल्यांमधून वाट काढत जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी सुमारे 12 किलोमीटरचे अंतर अवघ्या 4 तासात चालत पार केले. यावेळी जंगलातून चालताना रक्तपिपासू जळू(लिच) पायाला लागून देखील न डगमगता त्यांनी मार्गक्रमणा केली. पाटगाव येथून त्यांनी पदभ्रमंतीला सुरुवात केली.यावेळी हिल रायडर्स चे प्रमोद पाटील, हेमंत शहा, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, समिट ऍडव्हेंचर्स चे विनोद कांबोज यांच्यासह ट्रेकर्स देखील या मोहिमेत सहभागी झाले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले, मनः स्वास्थ्याच्या दृष्टीने ट्रेकिंग फायदेशीर आहे. याशिवाय कार्यक्षमता वाढवण्यासाठीही उपयुक्त आहे. अल्प सुविधा असताना 12 व्या शतकात बांधलेल्या इतक्या अवघड किल्ल्याची पदभ्रमंती करता आली. त्यामुळे आणखी चांगले काम करण्याची जिद्द मनात निर्माण झाली. अनेक वर्षांनी पदभ्रमंती केली, परंतू रांगणा किल्ल्याच्या पदभ्रमंतीचा अनुभव हा वेगळा व अत्यंत समाधान देणारा होता, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी जैवविविधता व जगाच्या पाठीवर केवळ पश्चिम घाटात उपलब्ध असणाऱ्या विविध औषधी वनस्पतींची माहिती जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी वनस्पती तज्ञ सुहास वायंगणकर यांच्याकडून जाणून घेतली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks