शाहू कारखान्याच्या प्रगतीमध्ये कर्मचार्यांचे मोलाचे योगदान : समरजितसिंह घाटगे; कारखान्यास सर्वोत्तम कारखाना पुरस्कार ,श्री घाटगे याना साखर उद्योग गौरव पुरस्कार व उच्चांकी बोनसबद्दल राजे समर्जीतसिंह घाटगे यांचा कामगार संघटनेमार्फत सत्कार

कागल प्रतिनिधी :
शाहू साखर कारखान्याच्या प्रगतीमध्ये कर्मचार्यांचे योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी काढले.
येथील राजर्षी शाहू सभागृहात श्री. छत्रपती शाहू साखर कामगार संघाच्या वतीने शाहू साखर कारखान्यास देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना व राजे समरजितसिंह घाटगे यांना डीएसटीएचा साखर उद्योग गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच कर्मचाऱ्यांना उच्चांकी बोनस जाहीर केल्याबद्दल श्री घाटगे यांचा सत्कार केला.त्यावेळी ते बोलत होते. संघटनेच्यावतीने अध्यक्ष कृष्णात चव्हाण, बाळासो तिवारी, मारुती अंगज यांच्या हस्ते श्री. घाटगे यांचा सत्कार केला.
यावेळी ग्रामदैवत गहिनीनाथ गैबीपीर दर्ग्या पासून श्री घाटगे यांना कर्मचाऱ्यांनी खांद्यावरून उचलून घेऊन जयघोष करीत सभास्थळापर्यंत आणले.
श्री.घाटगे पुढे म्हणाले मला जो मान-सन्मान मिळतो आहे. याचे सर्व श्रेय कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे याना जाते.त्यांनी शाहू ग्रुपला जी एक व्यवस्था घालून दिली केली. त्याला आहे.हे करीत असताना त्यावेळी त्यांची काही लोकांनी थट्टा केली. पण यामध्ये त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. प्रसंगी राजकीय व्यक्तिगत किंमत चुकविली. यावेळी त्यांना आपण व सर्व सभासद बंधु भगिनींनीही साथ दिली.हे आम्ही विसरणार नाही. कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी अखेरपर्यंत सलोख्याचे संबंध जपले. कारखाना स्थापनेनंतर अल्पावधीतच कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग लागू केला होता. कर्मचारी हिताची त्यांनी निर्माण केलेली परंपरा मी पुढे चालवित आहे. याचा मला अभिमान आहे.
व्यासपीठावर शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक यशवंत उर्फ बॉबी माने युवराज पाटील,राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील, व्हाईस चेअरमन नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव यांच्यासह शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बाळासो तिवारी, महादेव करिकट्टे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत संघटनेचे अध्यक्ष कृष्णात चव्हाण यांनी केले.मारुती आंगज यांनी आभार मानले.