युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळावे : आमदार प्रकाश आबिटकर

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायातून बेरोजगारांनी रोजगार निर्माण करावा असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. आमदार आबिटकर मुरगुड येथील सिलाई वर्ल्ड च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील होते तर प्रमुख उपस्थिती गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, मुरगुड चे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार , युवा नेते दिग्विजयसिंह पाटील होते.एस माॅलचे मालक, मोहन गुजर यांनी स्वागत केले तर प्रस्ताविक निशांत गुजर यांनी केले
दररोजच्या दिवशी दोन्ही ड्रेस वर दोन ड्रेस फ्री असल्या मुळे मुरगुड पंचक्रोशीतील महिलावर्ग व ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता .
महिलांनी तर तुफान गर्दी केली होती तसेच त्यांना उद्घाटन दिवशी स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्यात देण्यात आला.कार्यक्रमासाठी, रणजीत सूर्यवंशी, जीवन साळोखे, राहुल वंडकर, तानाजी साळोखे ,किशन जठार , डि डी चौगले, आनंदा मांगले संतोष वंडकर, नामदेव भांदिगरे, किशोर पोतदार,किरण गवाणकर आदी उपस्थित होते .आभार सौ सुनीता मोहन गुजर यांनी मानले.