आमदार विनय कोरे सावकर यांच्या प्रयत्नातून आसगाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन ; भास्करराव पेरे पाटील यांची उपस्थिती

कळे -वार्ताहर अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील आसगाव येथील ग्रामपंचायतीकडून आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील व कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, व यशवंत बॅंक कुडित्रे संचालक प्रकाश देसाई यांच्या उपस्थितीत आमदार विनय कोरे सावकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले.
आसगाव गावाची १९७८ साली स्थापन झालेली ग्रामपंचायत यावेळी बिनविरोध पार पडली.त्यामुळे सध्या गावामध्ये शांतता व सलोख्याचे वातावरण असून सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, जेष्ठ नागरिक यांच्या व आमदार डॉ विनय कोरे सावकर यांच्या प्रयत्नातून जलजीवन नळपाणी पुरवठा योजनेसाठी पन्नास लाख तर ग्रामपंचायत बिनविरोध झाले बद्दल आमदार विनय कोरे यांनी जाहीर केलेला पन्नास लाख रुपया मधील पहिला टप्पा पंधरा लाख रुपयेतुन रस्ता उद्घाटन, तसेच ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग मधुन विविध विकासकामे यांचे तसेच गावचे प्रसिद्ध पैलवान महाराष्ट्र केसरी संभाजी हरी पाटील यांच्या स्मरणार्थ गावातील नव्याने उभारण्यात आलेल्या तालमीचे उदघाटन करण्यात आले.यावेळी प्रदिप मधुकर भोसले यांच्या प्रयत्नातून भारती हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर
घेण्यात आले.याचा लाभ गावातील अनेक जेष्ठ नागरिकांनी घेतला.
त्यानंतर गावासाठी सरपंच काय करु शकतो या विषयावर आदर्श सरपंच पुरस्कृत भास्करराव पेरे-पाटील यांनी व्याख्यान देत गावात,”
निवडून कोण आले हे महत्त्वाचे नाही तर निवडून आल्यानंतर काय करायचे हे महत्त्वाचे आहे.
गावात स्वच्छ पिण्याचे पाणी, फळांची झाडे, गावात स्वच्छता राखा,मुलांचे शिक्षण ,वयस्करांना जीव लावा. रक्षाविसर्जन शेतात करा.शासनाच्या चारशे योजना आहेत गावासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ घ्या.ग्रामसेवकांना सन्मान द्या.
आपसात वाद करु नका,ग्रामपंचायत कर वाढवा व लोकांना चांगल्या सुविधा द्या. अतिक्रमण करु नका.”अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी गावातील सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा, सर्वात जास्त उस उत्पादक शेतकरी, सर्वात जास्त दुग्ध उत्पादन व विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या सर्व नागरिक व महिला तसेच ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी मुख्य भुमिका निभावलेले महिपती बाळू सावंत व चंद्रकांत देवाप्पा पाटील यांना ग्रामपंचायतीकडून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी भागातील विविध गावचे सरपंच,गावातील सरपंच मानसिंग विलास भोसले उपसरपंच मगर पंडित पाटील ,सदस्य भिकाजी पांडुरंग पाटील प्रवीण बाजीराव पाटील, सदस्या सुनिता किरण भोसले, रोहिणी भारत पाटील, सोनल विजय पाटील, तेजस्विनी सागर पाटील, ग्रामसेवक गणेश सुभाष जाधव, शिपाई अर्चना संतोष पाटील, सखाराम मारुती लोंढे ,सर्व सेवा संस्थांचे सदस्य,तरुण कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत अनिल पाटील तर प्रास्ताविक श्रीकांत पाटील यांनी केले.सुत्रसंचालन सुधाकर देसाई(भामटे )तर आभार भिकाजी पाटील यांनी मानले.