ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागल : रोहित मोरबाळे यांची ‘राज्यस्तरीय युवा आयडॉल ‘ समाजरत्न पुरस्कारासाठी निवड

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र राज्य युवा आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२३ साठी कागल नगरीचे सुपुत्र किल्ले रायगड पालखी सोहळा समितीचे जिल्हाध्यक्ष रोहित मोरबाळे यांची निवड झाली आहे.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्यावतीने हा पुरस्कार दिला जात असुन राज्यस्तरीय गुनिजन गौरव महासंमेलन निमित्ताने 30 सप्टेंबर ला मुंबई येथे हा पुरस्कार वितरण केला जाणार आहे.
समाज्यासाठी सातत्याने भरीव कार्य करत शिव-शंभूराजेंचा इतिहास,विचार प्रसार करत अनेक समाज उपयोगी कामे करण्याऱ्या सेवाभावी स्वतंत्र प्रतिभेच्या अभ्यासु युवा नेतृत्वाला मिळालेला हा पुरस्कार नक्कीच उभारी देणारा आहे.