हॉटेल कामगार संघटनेच्या वतीने आमदार प्रकाश आबीटकर यांचा सत्कार

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
आमदार प्रकाशराव आबीटकर यांच्या कार्यालयात जाऊन हॉटेल कामगार कल्याणकारी मंडळ होण्यासाठी हॉटेल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव कांबळे आणि रवींद्र जाधव यांच्यासोबत मुंबई येथे आमदार निवासी भेट घेऊन दोन वर्षापासून संघटनेने सतत आमदार आबीटकर यांचेकडे पाठपुरावा करून त्यांच्यामार्फत या हॉटेल कामगारांना न्याय मिळावा या अपेक्षेने संघटना पाठपुरावा करत होती आणि ह्या अपेक्षा आता आमदारआबीटकर यांनी कामगार मंत्र्यांच्या कडे पाठ पुरावा करून हे काम पूर्ण तत्वास आणले याबद्दल त्यांचा सत्कार कामगार संघटना जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी केला.
लवकरच या हॉटेल कामगार कल्याणकारी मंडळ चा जीआर निघेल आणि बाकी इतर सर्व चर्चा जवळ एक तास आमदार यांचेशी चर्चा झाली भेटून आनंद वाटला आमदार आबिटकर यांचे हॉटेल कामगाराबद्दलचे प्रेम पाहून डोळे भरून आले सर्वसामान्य हॉटेल कामगार साठी साहेब नक्की पुढे घेऊन जातील अशी अपेक्षा यावेळी हॉटेल कामगार यांनी व्यक्त केली.