ताज्या बातम्यामहाराष्ट्र
दि मुरगूड इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन्सच्या अध्यक्षपदी मा. बाळासो सुर्यवंशी तर उपाध्यक्षपदी मंदार सुर्यवंशी व सचिवपदी ओंकार खराडे यांची निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील दि मुरगूड इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन्सच्या अध्यक्षपदी . बाळासो सुर्यवंशी
यांची तर उपाध्यक्षपदी मंदार सुर्यवंशी व सचिवपदी ओकांर खराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी प्रविण दाभोळे होते.
स्वागत ,प्रास्ताविक सागर भोसले यांनी केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार विशाल रामशे ,विशाल सुर्यवंशी, आकाश दरेकर व यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल रामशे, सागर भोसले संतोष पाटील,मयूर आंगज,विवेकानंद सुर्यवंशी,आकाश आमते , संदेश शेणवी,शुभम भोसले, हर्षल अस्वले,दीपक पाटील , अजिंक्य पाटील, पुरुषोत्तम देसाई , चेतन मोहिते ,संतोष बोटे ,जमीर शिकलगार .आदी प्रमुख उपस्थित होते .आभार विक्रम घाटगे यांनी मानले.