शासन व नागरिकांमधील दुवा बनून लाभ मिळवून देण्यासाठी आम्हीच जनतेच्या दारात : राजे समरजितसिंह घाटगे

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शासकीय योजनांच्या लाभासाठी नागरिकांनी नेत्यांच्या दारात जाणे या पारंपरिक पद्धतीला आम्ही फाटा दिला आहे. विविध योजनांचे लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी शासन व नागरिक यांच्यामधील दुवा बनून आम्हीच जनतेच्या दारात जात आहोत.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त राजे फौंडेशन व राजमाता जिजाऊ समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “चला संकल्प करुया-७५हजार लाभार्थ्यांना लाभ देऊया” उपक्रमांतर्गत समरजितसिंह आपल्या दारी अभियानावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी दोन्ही सांगाव व रणदिवेवाडी येथील सोळा लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी हितगुज साधले.विविध योजनांमधील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप केले.शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल अमरसिंह निंबाळकर यांचा सत्कारही केला.
श्री.घाटगे पुढे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांच्या लाभासाठी येरझा-या माराव्या लागतात. त्यामुळे याकडे ते दुर्लक्ष करतात. स्व.राजेसाहेब व स्व.मंडलिकसाहेब यांच्या पात्र माणूस बघून लाभ देण्याच्या संस्कारानुसार गट-तट न बघता आम्ही लाभ देत आहोत.त्यामुळेच आमच्या अभियानास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी आप्पासाहेब पाटील, बापूसो शेटे, उपसरपंच प्रवीण माळी, रणदिवेवाडीचे सरपंच राहुल खोत,विक्रमसिंह जाधव,वीरशैवचे संचालक राजेंद्र माळी, मनोज कडोले, सुदर्शन मजले, संदीप क्षीरसागर, प्रवीण माळी,विजय घाटगे,बाळासो गुरव आदी उपस्थित होते.
यावेळी रूपाली खोत,प्रकाश मगदूम, सुभाष दळवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत राजे बँकेचे संचालक बाबासाहेब मगदूम यांनी केले. प्रास्तविक शाहूचे संचालक युवराज पाटील यांनी केले.आभार लखन हेगडे यांनी मानले
विरोधकांकडून राजेंची काॕपी….
शाहूचे संचालक युवराज पाटील म्हणाले, समरजितसिंह घाटगे यांच्याकडे कोणतेही सत्तेचे पद नसताना ते विविध सामाजिक उपक्रम व शासकीय लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवत आहेत. त्यांच्या अशा उपक्रमांची कागलमध्ये काही जण कॉपी करत आहेत. याआधी ते त्यांना का सुचले नाही? असा प्रश्न उपस्थित करत ते राजेंची काॕपी करत असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लावला.