ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

मराठा आरक्षण : वंचित बहुजन आघाडीचा पाठिंंबा! प्रकाश आंबेडकर स्वत: मोर्चात होणार सहभागी

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी उद्या महाराष्ट्रात मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला आता वंचित बहुजन आघाडीने देखील पाठिंंबा दर्शवला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर स्वत: या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी उद्या प्रकाश आंबेडकर कोल्हापूरात दाखल होतील. काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंंबेडकर यांनी संभाजीराजेंची भेट घेतली होती. यानंतर आता उद्या मोर्चात सहभागी होऊन मराठा आंदोलनाला ते आपला पाठिंबा दर्शवणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन याविषयी माहीती देण्यात आली आहे.

उद्या 16 जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या अधिकृृत ट्वीटर अकाउंटवरुन देण्यात आली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले हे दोन्ही राजे देखील एकत्र आले आहेत. कालच या मुद्द्यावरुन संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंची पुण्यात भेट झाली होती.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks