महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना कोल्हापूर जिल्ह्यात पद नियुक्ती

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंगीकृत महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना अंगीकृत संघटनेचे आजपासून शुभारंभ करण्यात आला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हेमंत संभूस – मनसे राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने, व मनसे राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हेमंतजी संभूस यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी युवराज येडूरे यांच्यासह आज ९ जणांच्या नियुक्त करण्यात आल्या, आज नियुक्तीपत्र देत असताना , हेमंतजी संभूस, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेश दादा चौगुले, सचिव श्री. आकाश बुगडे , राज्य संघटक श्री. संतोष पाटील, राज्य संघटक श्री. केदार कोडोलीकर, राज्य संघटक श्री. रोहित गुजर. श्री.निखिल जोशी , श्री. राहुल वानखेडे , श्री. अनिल पवार.या सर्व नियुक्त एक वर्षाच्या कालमर्यादा पर्यंत असतील पक्षातील सर्व ध्येयधोरण समोर ठेवून पक्ष वाढीसाठी व कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच शहरातील नागरिकांच्या ध्येय धोरणासाठी व शहरातील नागरिकांच्या अडीअडचणीसाठी यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना काम करेल,
महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना खालील प्रमाणे कोल्हापूर जिल्हा व शहरात नियुक्ती करण्यात आल्या
▪ श्री.युवराज येडूरे – जिल्हाध्यक्ष कोल्हापूर
▪ श्री.वृषभ आमते – जिल्हा संघटक कोल्हापूर
▪ श्री डॉ. सतीश खोत – जिल्हा संघटक कोल्हापूर
▪ श्री सौरभ कांबळे – राधानगरी शहराध्यक्ष
▪ श्री.परशुराम दोरुगडे – गडहिंगलज तालुका अध्यक्ष
▪ श्री.अभिजीत कीर्तीकर – गडहिंगलज शहराध्यक्ष
▪ श्री अमित कोरे – भुदरगड तालुका अध्यक्ष
▪ श्री मारुती केसरकर – भुदरगड शहराध्यक्ष
▪ श्री.विजय लोखंडे – आजरा तालुकाध्यक्ष
असे महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना असे नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कोल्हापूर मनसेच्या च्या वतीने स्वागत शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी कोल्हापूर ग्रामीण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रभास साबळे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुफल, वैभव माळवी, आजरा उपाध्यक्ष आनंद घंटे हे उपस्थित होते.