दीन-दलित,उपेक्षितांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील :समरजीतसिंह घाटगे ; मुरगुड येथे शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
छ.शाहू महाराज आणि स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आदर्शवत कर्तृत्वाचे संस्कार आमच्यावर आहेत.त्यामुळे कोणाच्यातरी हेकेखोरीमुळे शासकीय योजनांपासून वंचित असलेल्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.असे प्रतिपादन भाजपचे नेते,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
मुरगुड (ता. कागल) येथे घाटगे यांच्या प्रयत्नांमुळे मंजुर झालेल्या संजय गांधी,श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू कृषी संघाचे चेअरमन अनंत फर्नांडीस होते.
श्री.घाटगे म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना नेत्यांच्या दारात जावे लागते.त्यांना वेठीस धरण्याचे प्रकार होतात.राजकीय स्वार्थापोटी पात्र लाभार्थी यांना वंचित ठेवले.याचा आपल्याला खेद वाटतो. आपण कोणताही गट-तट, जात,पात,धर्म न पहाता पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देत आहोत.
यावेळी घाटगे यांच्या हस्ते संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील हासुर बु. (या.कागल) येथील सुवर्णा रमेश भोसले,उज्वला अनिल चौगुले,शंकुतला नानासो जाधव,सुरेश सखाराम भोसले या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजूरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बिद्रीचे माजी संचालक सुनीलराज सूर्यवंशी,दगडू शेणवी (माजी उपनगराध्यक्ष), विलास गुरव (माजी नगरसेवक), सुशांत मांगोरे,अमर चौगुले,राजू चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत प्रास्ताविक प्रताप पाटील यांनी केले. आभार विजय राजिगरे यांनी मानले.