कागल : शाहू साखर कारखान्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याचा कार्यक्रम

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याचा कार्यक्रम झाला.
कोल्हापुर जिल्हा पोलीस दल,कागल पोलीस स्टेशन,महामार्ग पोलिस व छत्रपती शाहू साखर कारखाना यांचे संयुक्त विदयमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी वाहतूक विभागाच्या पोलीस निरिक्षक स्नेहा गिरी म्हणाल्या,सध्या साखर हंगाम सुरू असल्याने ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रॅक्टर गाडी या वाहनावर सर्वच वाहनचालकांनी सुरक्षिततेसाठी रिफ्लेक्टर बसवावेत. वाहनधारकांनी वाहन चालवताना आपली सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत .असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस निरिक्षक चंद्रकांत शेडगे म्हणाले, सर्व वाहन मालकांनी वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे. कारखान्याकडून उपलब्ध करून दिलेले रिप्लेक्टरचा सर्वांनी लाभ घ्यावा.
कागल पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संजय गोर्ले म्हणाले, चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवले तर आपोआप अपघातावर नियंत्रण राहील व अपघातमुक्त हंगाम संपन्न होईल.
यावेळी शेती आधिकारी रमेश गंगाई,ऊस विकास आधिकारी के. बी. पाटील,तोडणी वाहतूक संस्थेचे व्यवस्थापक के. अे. घराळ, पोलीस निरिक्षक अनिल पाटील, कविता नाईक,आर. आर. गायकवाड,विक्रम जरग,सुनिल गोरे, यांच्यासह वाहतूक कंत्राटदार ,ट्रॅक्टर मालक, बैलगाडी कंत्राटदार उपस्थित होते.
स्वागत बाळासाहेब तिवारी यांनी केले.आभार शिवाजी पाटील यांनी मानले.