ताज्या बातम्यामहाराष्ट्र
हिरलगेचे सुपुत्र कार्तिक सुतार यास तबलावादन मधील विशारद पदवी प्राप्त

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
हिरलगे येथील सुपुत्र कार्तिक नंदकुमार सुतार याने तबलावादन परीक्षेत विशारद पदवी प्राप्त केलेने सम्पूर्ण तालुक्यात त्याचे कौतुक होते आहे. सदर परीक्षा हि अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांचेवतीने (देवल क्लब,कोल्हापूर) येथे घेण्यात आली होती. यामध्ये तो पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला हा कोर्स सात वर्षाचा असतो. या परीक्षेसाठी त्याला तालसाधना तबला विद्यालय गडहिंग्लजचे शिक्षक संभाजी परीट यांचे मार्गदर्शन लाभले असून आई, वडील, बहीण यांचेही कार्तिकला प्रोत्साहन मिळाले आहे.